Friday, 22 December 2017

इच्छा

बंड्या लेका कालचा हवा येऊ द्या पायलास काय? शारूकचा अाप्पासाहेब पाहिल्यावर मी रोमांचीत झालोय लेका.

बंड्या :- का ?

अरे गेली कित्येक वर्ष वसंतरावांचं मृगनयना गायची इच्छा होतेय. शारूक अाप्पासाहेब करू शकतो तर मी मृगनयनेला हात का घालू नये.

बंड्या :- शारूकनी मनात आणलं तर लेका दीड दोन हजाराचं पेड पब्लीक आणून बसवेल आप्पासाहेबासाठी. तुझ्या मृगनयनीला विचारतंय कोण ? नंतर गणेश नाष्टा सेंटरला नेणार असलास तरी मी येणार नाही, ह्या ह्या ह्या लेका चाललायस मृगनयनीला हात घालायला.

उत्साहावर पाणी फिरवणारे असले तरी हेच दोस्त आपली अनमोल ठेव आहेत. नाही त्या हुच्चगीरीपासून लांब ठेवणारे .

No comments:

Post a Comment