एटीम च्या लायनीत उभा होतो.
माझ्यापुढच्या माणसाने मागे वळून पाहिलं मी ओळखीचं हसलो. ( ओळख नसताना ).
तो ही हसला.🙄🙄
थोड्या वेळानी त्यानी विचारलं काय काय ? मजेत हल्ली बरेच दिवसात गाठभेट नाही
हं हं अहो व्यापच एवढे वाढलेत काय करणार देशपांडे काय म्हणतात ? (मी सावध, हायला हे बेणं ओळखतय मला )
अहो त्यांचीही गाठभेट होत नाहीये.
अच्छा तोपर्यंत त्याचा नंबर आला पैसे काढले, मी आत गेलो २००० काढले . समोर तो माणूस थांबलेला मी म्हणालो
चला ओक्के भेटूया
ओक्के सुंदर हास्य प्रसवत तो - भावड्या आज सकाळीच तुझ्यासारखाच मीही कायप्पाचा मेसेज वाचलाय रोज कुणातरी अनोळखी व्यक्तीकडे बघून हसत जा ( म्हणजे तो बुचकळ्यात पडेल याला कुठं पाहिलय ) 😁😁😁😁😁😁😁😁,
No comments:
Post a Comment