सकाळी उठा रेंsssss
प्रातर्विधी आणि प्राप्तविधी करा रेंssss
बकाबका नाष्टा करा रेंsssss
फास्टात पळत गाडी पकडा रेंssss
हुउउउउउश्श करत मस्टर साईन करा रेंsssss
क्लायंटसना मूडूनूरूप हँडल करा रेंssss
किंवा
बॉसच्या मूडूनूरूप वझ्झी वाहा रेंssss
आपापल्या व्यवसायानुसार चुन्ना झिजवत हाडाची काडं करा रेंssssss
हा हन्त हन्त नलीनी वेग्रे टाईप्स किंवा ओ बूलशीट यार (हे मनातल्या मनात ,) थकल्या भागल्यावस्थेत घरी परता रेंsssss
जिथे पोचल्यावर बाहेर होतो किंवा ते तेच बरं होतं म्हणा रेंsssssss
त्रागा करा, विनंत्या मिनंत्या करा, गिळा बिळा, रेंssssss
पहाटेच्या अर्ली इंदी मॉर्नींगच्या अलार्मचा गजर लावा रेंsssssss
आणि झोपा रेंssssss
बाय द वे , अधून मधून फेस्बूकावर प्रचंड हुषारीच्या पोश्ट , कमेंट करा रेंssss
थोड्याबहूत फर्काबिर्काने तेच तें आणि तेंच ते आयुक्ष सुरू असतं, रें रें करी, कूरकूरत.
वैतागल्या, कंटाळल्या, वतवतलेल्या आयुक्षा बियुक्षात लॉटस् ऑफ लकची एक वेळ येते, अचानक किंवा प्ल्यानड तुम्ही एखाद्या शांत निवांत जागी पोहोचता.
तिथे वेळ कमी मिळतो खरा , पण फिलींग स्याटीस्फाईड वेग्रे होतं.
अस्सल माती, अस्सल जीवन , थोड दूडदूड थोडे शांत मन, अशी अवस्था होते. निसर्गांचं दर्शन , आणि तिथंच जुळली जाणारी तुमची नाळ.
शांत आनंदाचा काळ.
असतो फार कमी पण पटकन अनुभवला तर पुन्हां त्या रें रें करी आयुक्षाला सहज सामोरं जायला , बळ देणारा, हूरूप वाढवणारा.
शांता शेळकेंची ही कवीता वाचलीत तर त्यांच्याबरोबर आपणही तिथं पोहोचू.
_______________________
आम्रतरू हा धरी शिरावर प्रेमळ निज साऊली
मृदूल ,कोवळी, शामल हिरवळ पसरे पायांतळी
आणिक पुढती झरा खळाळत खडकातून चालला
साध्याभोळ्या गीतांमध्ये अपुल्या नित रंगला
काठी त्याच्या निळी लव्हाळी डुलती त्यांचे तुरे
तृणांकुरावर इवलाली ही उडती फुलपाखरे
खडा पहारा करती भवती निळेभुरे डोंगर
अगाध सुंदर भव्य शोभते माथ्यावर अंबर
दुर्मिळ ऐसी देई शांतता , सदा मला हे स्थल
ऐकु न येई इथे जगाचा कर्कश कोलाहल
व्याप जगाचा विसराया मी येई इथे सत्वर
अर्धोन्मिलीत नयनी बघते स्वप्ने अतिसुंदर
शांतविले मी तप्त जीवाला इथे कितींदा तरी
कितीदा यावे तरी येथली अवीट ही माधुरी
-शांता शेळके
No comments:
Post a Comment