अर्धवट झोपेतून जागं होताना अस्पष्ट आवाजातलं कुजबुजणं कानावर आलं. कुणीतरी कुणालातरी समजावत होतं.
निराश होऊ नको.
प्रत्येकाचं नशीब हे लिहीलेलं असतं तसंच घडतं , वृथा निराश होण्यात समय बरबाद करू नकोस.
प्रत्येकाचं भाग्य उजळण्याच्या एक दिवस असतो.
आयुष्यात डाग हे पडणारच, धुतले जातात का हे महत्वाचे आहे.
आज एकानी त्याग केला म्हणून खचून जायचं कारण नाही उद्या आपला उपयोग अनेक जणांकरता असू शकेल.
.
.
.
.
.
.
आज आपण खुंटीवर असलो तरी आपण उद्या पायपूसणं होऊ शकतो.😀😀😀😀
खुंटीवरचा जुना पंचा , बनीयनची समजूत काढत होता.
सुप्रभात, आपला दिवस आनंदात जावो
No comments:
Post a Comment