तुमच्यामधे एक नट
जरा खट, जरा नटखट
उभे करी डोळ्यासमोरी
पाहिले जे सरसकट
तुमच्यामधे एक गायनप्रेमी
पेटीतून स्वरविश्व निर्मीतो
हिंदुस्थानी संगीताची
मनमुराद महती गातो
तुमच्यामधला निर्मळ दोस्त
गप्पाष्टकांचे अड्डे जमवतो
वसंतखाँ, कुमार गंधर्वांचे
किस्से आम्हा सांगून जातो
तुमच्यामधे निरीक्षक एक
व्यक्ती , प्रसंग टिपत जातो
लेखनासाठी तपशीलवार
मनांत टिपणे साठवून ठेवतो
तुमच्यामधे कार्टे एक
व्रात्य आणि जरा खोडकर
चुकीचे जे दिसेल काही
उडवी त्याची खिल्ली कलंदर
तुमच्यामधे वाचक एक
चिरंतन सुंदर वाचत जातो
तुमच्यामधला रसीक व्यासंगी
गुण तयांचे गातच बसतो
तुमच्यामधला एक दानशूर
उपक्रम समाजातील शोधत जातो
केली मदत वा दिले दान
तळपायावर लिहीत जातो
तुमच्यामधला अचाट लेखक
प्रतिभेने आम्ही थक्क होतो
लाडके व्यक्तीमत्व तुम्ही
आम्ही झटकन बोलून जातो
अशा सर्वांना बरोबर घेऊन
समृद्ध आनंदभांडार निर्मीला
स्वतःस समजतो धन्य आम्ही
गोड आजोबा आम्ही पाहिला
कॉमन मँन आवडीचा तुमचा
आरकेंनी रेषांनी रेखाटला
शब्दांच्या समजून लहरी
शब्दांत तुम्ही रंगवीला
वाचले ज्यांचे माझ्या आजोबांनी
भाचा माझा आज वाचत आहे
तुमच्यामधल्या खेळियाला
साष्टांग नमन माझे आहे
हेरंब जोशी
No comments:
Post a Comment