जीम आणि स्वीम नी कमावलेली बॉडी, वेल केयर्ड हेयर्सचा मागे बांधलेला पोनी,रूबाबदार दिसणारा साडेपाच फूट उंचीचा तो. कुशनींगवर मान टेकून रिल्याक्स, सैलावल्यासारखा बसलेला तो.
जवळपास त्याच्याच एजची ती, सावळी , जाडी नाही म्हणता येणार पण योग्य तिथे गुबगुबीत, चेह-यावर कोवळेपणा, पण जी इच्छा त्यानं व्यक्त केलीय ती पूर्ण करायला समर्थ असल्याचे भाव नजरेत बाळगून असणारी ती.
एसीचा गारवा, त्यानी यूज केलेल्या परफ्यूमचा एक मंद सुवास, ती दोघंच.
काही मिनीटांपूर्वीच ती जवळ येऊन गेलीय त्यावेळी आलेली काहीशी बधीरता.
ती जवळ येते. लाईटस पूर्ण ऑफ, फक्त एक वगळता ,तोही फक्त दोघांनाच कव्हर करणारा. जवळ आल्यावर ती थोडी झुकलीय.
झुकताना कपाळावर आलेली बट, नाजूक करंगळीने तीनं मागे सरकवलीय.
दोघांतलं अंतर खुपच कमी.
त्याचा श्वास तीला जाणवतोय , तिचा श्वास त्याला. चेहरा आणि जवळ. वाढलेले हार्ट बीटस्.
त्यानी व्यक्त केलेली इच्छा पूर्ण व्हायला लागलीय.
तीच्या चेह-यावर घर्मबिंदू, विलक्षण एकाग्रतेने तीच्या हालचाली.
हालचालींचा वेग वाढतो.
एक छोटीशी कळ येते. तीच्या चेह-यावर समाधान.
.
.
.
.
.
.
.
.
.
चिमटासदृश हत्याराने उपसलेली त्याची ठसठसणारी दाढ ती बाजूच्या ट्रे मधे टाकते.टाणकन आवाज.
दोघांचेही चेहरे प्रफुल्लीत.
#इच्छापूर्तीचा_आनंद_या_सदरातून
No comments:
Post a Comment