Friday, 21 April 2017

माझी एक इच्छा आहे, कधी पूर्ण होईल ते शिवशंभो जाणे. श्रावणात गोखले सर घेऊन जातात वेळणेश्वरला, त्यांचं कुलदैवत. वेळणेश्वरच्या मंदिरात गाभा-याबाहेर असलेल्या संगमरवरी उजव्या सोंडेच्या गणरायासमोर संकल्प सोडायच जोशी / जोगळेकर गुरूजी सांगतील तसा, मग पुजेची ताटं घेऊन गाभा-यात जायचं, पाटावर बसून मागच्या समयांच्या उजेडात , अभिषेक करायचा. कुणी शिवमहिम्नाचा पाठ करत , कुणी रूद्रपाठ करत अभिषेक सुरू असतो, वेळणेश्वर, त्याच्या भोवतालचा नाग, काळ्या शिवलिंगावर, विवीध रंगांची फुलं,बेल, चंदनाचे टिळे, अभिषेकपात्रातून संततधार पाण्याची, भाविकांनी दूध आणलं असेल तर दूधाची , परत पाण्याची. इतकं तल्लीन व्हायला होतं. त्यात स्पष्ट उच्चारातलं रूद्र कानांवर पडायला लागलं की भान विसरायला होतं . माझी इच्छा अशी की हा अभिषेक करायचाय तो महाशिवरात्रीला ते ही स्वतः रूद्र म्हणत. ( मला रूद्रपाठ येत नाही ) ह्रदयनाथ मंगेशकरांनी म्हटलेलं एक वाक्य आठवतय. काही इच्छा ह्या इच्छाच राहतात. कधी पूर्ण होतील की नाही सांगता येत नाही. बघूया त्या सांब सदाशिवाच्या मनी काय आहे ? कुणास ठाऊक भोलेनाथाची कृपा झाली तर…..  (फोटो नेटवरून घेतलेला आहे )

No comments:

Post a Comment