Monday, 24 April 2017

एप्रिल, मे महिना.

सुट्टीचा दिवस.

सकाळी मॉर्नींग वॉकपासून घामाचा चिकचिकाट.😏😏

ठंडे ठंडे पानीसे नहाकर बाहेर येईस्तो पुन्हा घाम.

बाजारात पिशव्या घेऊन चक्कर मारून यावी.

उन्हाच्या झळा सोसत, गाडीच्या ह्यान्डलला पिशव्या अडकवून परतावं.

घरी बसल्यावर , गरम हवा फिरवणा-या पंख्यानी वात यावा.

सरबत , पाणी ढोसत , कंटाळलेल्या मठ्ठ चेह-यानी टीव्हीवर निरर्थक काहीतरी बघत बसावं. 🤓

दुपारी रणरणणं जास्तच जाणवावं.

घरातली पीकली पानं, बसल्याजागी हाश्श हुश्श करत आमच्याकाळी असं नव्हतं हे पर्फेक्ट करवादून टाकणारं वाक्य हुकमी पद्धतीने टाकतात ते ऐकावं.😬😖😖

सुट्टीचा दिवस म्हणून आलु परोठे , सुरळी वडी , आणि नितांतसुंदर मोहक आमरस पुढ्यात यावा.

यथेच्छ भोजनोपरांत, बनियन, अर्धचड्डीत , नुसत्याच जमीनीवर उसाडावर डोस्क टेकून चीप पडून रहावं .

जडावल्या पापण्या असतांना एक चीरपरीचीत आरोळी कानी यावी.

ताडकन उठून , स्टेनलेस स्टीलच्या गंज घेऊन,  आहे त्याच पोषाखात धावत जावं, आणि पुन्हा धावत परतावं, मग  एक हात कुल्फीखाली धरून , स्लीssक , स्लुsssक आवाज करत थंडगाsssssssssssर , कुल्फीनंदी तल्लीन व्हावं . 😍😍

आलेला उन्हाळा काही क्षण हवाहवासा वाटू लागतो.

No comments:

Post a Comment