Friday, 21 April 2017

विवीध विषय विवीध त-हा,
लेखकांची इथे मांदियाळी
क्षणात कधी तर कालावधीने ,
झट झट जे लिहीती ओळी 

कुणी लिहीती गंभीर काही ,
करीत काही तात्वीक चिंतन
कुणी लिहीताना आणती आव ,
केले जणू वैचारीक कुंथन 

कुणी टाकूनी फोटो लिहीती, 
जंगलकथा विस्मयचकीत
कुणी लिहीती लडीवाळ कवीता,
गात्रे व्हावी सारी रोमांचीत 

कुणाचा असे हातखंडा ,
अश्रु उभे करती डोळ्यात
टचकन कुणी मारती अस्खलीत टोमणे,
सुंदर काव्यामधूनी सटकन 

लिहीती  पाककृतींवर झणझणीत,
कधी अगदी गोड गुळूगुळू
कुणी लिहीती खंडीभर प्रेमकथा,
प्रणय असे ज्यात घुळूघुळू 

व्यावहारीक देती सल्ले कुणी,
कुणाचे जीवन अवघे भगवे
कुणी मांडती जळजळीत सत्य
रोखठोक वास्तव नागवे 

कुणी असतो मनात शायर,
नग्मे बिग्मे शायरी लिहून जातो
अजरामर गाण्यांच्या आठवणी
कुणी असा सुखावून जातो 

कुणास सुचती दोनोळ्या,
अर्थवाही अन एकोळ्या
कुणी हसवती कुणी सांगती
सार अवघे त्या चारोळ्या 

या लेखकांमधला असे एक मी ,
जरा बरा जरा वेडा
पटवर्धनांच्या पोस्टीत डोकावणारा
जणू एक शेंबूडकीडा

वाचत गेलात सारे तुम्ही,
खरडताना काही बाही
दिलीत दाद स्नेहभरी,
कधी केली तक्रार नाही 

असाच येईन पीडण्या पुन्हां,
उत्साहाचे वारे भरले
लोभ असू द्या असाच मंडळी
सर्वांचे व्हावे चांगभले  __/\__

No comments:

Post a Comment