स्वच्छ, निर्मळ विनोद अनुभवायचाय, बर्वेभौंचं बै आणि मी मिळवाच. चिमणराव , गुंड्याभाऊ हे चिं.वि. जोशींचे मानसपुत्र, जनु बांडे रमेश मंत्रींचाच नं ? तशीच बर्वेभौंची ही बै. लिखाण काल्पनीक आहे हे पटवून घ्यायला मन मानत नाही इतकी सुंदर चितारलीय ही बै. सांगण्याचा लहेजा असा पकडलाय की बर्वेभौ, त्यांची बै अन दोन्ही कन्यका खरच अश्याच आहेत असच ठसत जातं मनात. जरासं स्वच्छंदी वागावसं वाटणारा गरीब स्वभावाचा मी, त्याचा प्ल्यान ओळखून किंवा तसा सौंशेय घेऊन त्याचे मनसुबे उधळवून लावणारी बै , बै ला नामोहरम करण्यासाठी आखलेले मी चे डावपेच , त्यांच्यातला जरासा रोमान्स, छोट्या छोट्या लठ्ठालठ्ठया, त्याचा वाटणारा विषाद, शेरे ताषेरे असली क्लासीक भट्टी जमवलीय बर्वेभौंनी कि पुछो मत. बै च्या मैत्रीणी, ई-साला , अँजेलीनो , ऑफीसातली प्रमीला, शवासनपुरेंना मारलेला शेवटचा पंच, सगळीच झकास जमलीयत , कशी आणि का ते वाचूनच पाह्यचं , नो सुट्टी. मधु आणि मी , माधुरी दिक्षीत (स्स हाय..) घरी आली तर काय होईल त्याचं वर्णन , रसीकतेनं केलय बर्वेभौनी. बुक्का हळद, ई-साला , दामले , लग्नाचा लाडू आणि वेळोवेळी येणारे सल्ले अफलातूनच अभियांत्रीकीचे साईड इफेक्टस मधे मी नी काही फटके स्वतःलाही दिलेयत नर्मविनोदी पद्धतीने. फादर्स डे ,प्रत्येक बापाला आपल्या घरचाच अनुभव आठवून देतो. खास बर्वेभौ काय चीज आहे ते दिसतं बायको हीच मैत्रीण , गणपती बाप्पा मोरयातून. उन्हाळ्या वाचल्यावर ज्याला झळ बसणार नाही असा वाचक कुणी निघेल हे शक्यच नाही. लाजवाब के सीवा लब्ज नाही. प्रस्तावनेत वहिनींनी लिहील्याप्रमाणे "रोजच्या धकाधकीत , थोडसं निवांत व्हायचं असेल , हलकं फुलकं वाचून मन उत्साही करायचं असेल तर बै आणि मी च्या कथा नक्कीच वाचता येतील. आयुष्यात घडणारे हे प्रासंगीक विनोद आपला रोजचा ताण हलका करून जातात" हो आणि वहिनीनीं लिहीलेली प्रस्तावनाही मस्तच. बर्वेभौ , तुमच्या या बै ला उदंड औक्ष मिळूं दे, बै आणि मी च्या पुढच्या आनंददायी निर्मळ विनोदी झुळूंकासाठी मनःपुर्वक शुभेच्छा 💐
No comments:
Post a Comment