Friday, 21 April 2017

मस्त थंडीच्या वातावरणात, नाईलाजानं वाकळीपासून दूर व्हावं, आवरावं, पोहे, उप्पीटं गिळून रोजमर्रा की जंदगी को जीने के लिए गाडीला लाथ घालून निघावं.  आणि कॉर्नरच्या फोटोग्राफरकडे , तिथून कॉलेजच्या रस्त्यापर्यंत, एरवी नजरेत न भरणा-या , आईच्या ठेवणीतल्या साड्या नेसून, ढिगानं पीना खोचून, कधी नव्हे नेसल्यानी ओचापदर सांभाळायची कसरत करणा-या , अबोली , मोग-याचे गजरे, वेण्या साडी डे निमित्ताने बघण्यात आल्या की कॉलेजचे दिवस संपून बरीच वर्ष उलटली असली तरी, अगदी दिड दा दिड दा नाही वाजल्या तरी मनाच्या सतारी अंमळ टुंय टुंय नक्कीच करतात .आणि मनमोहक आठवणींचा ताटवा फेर धरून नाचू लागतो

No comments:

Post a Comment