Wednesday, 12 April 2017

“हाय”
“हाय, काय रे बोल ? “ 
“ए ताई, एक विचारू ?” 
“होsssss, विचार की रे , तुला रे नाही कोण म्हणेल ? “ 
“ताई , मला सांग ना , तुला रादर टू से तुम्हां लेडीज बायकांना, असं रोम्यांटीक कवीता कश्या काय सुचतात ब्वॉ ?”
“ईईई , सुचतात काय म्हणतोस ? ती आम्हां बायकांच्या , अंतर्मनाच्या तळाशी साठवलेल्या, चिरंतन स्वप्नांची व्यक्त जगात उमटलेली प्रतिबिंबे असतात रे “

मी टोटली अवाक.  ताईनी डायरेक गुगलीच टाकला. 

“ताई , काssssही कळलं नाही, समजाऊन दे ना.”

“तुला नाही कळायचं , असू दे , असू दे , बायदवे तु का विचारतोयस, काही तशातली मज्जा वेग्रे नाही नं ?”

मग जीभलं बाहेर काढल्याची स्माईली.  “ताई , मला पण काही तरी तरल गद्यात्मक लिहायचय, मला वाट दाखवशील ?”
  “अय्या, चक्क तु लिहीणारेस ‘? ए कित्ती छान .”

“ए , सांग ना , कसं काय लिहू ?” 

“सांगते हं, हे बघ कालच तुझ्या दुस-या ताईनी वॉलवर तरल काव्यात्मक गद्य लिहीलय ते वाच , मनन कर, नंतर तुझ्या मित्रांच्या वॉलवर जा, ती रोज वावरताना सुखाबाबत काय विचार करतील त्याचा विचार कर. जे सुचेल ते उतरव , चल रे बाय, कामवाली आलीय, लक्ष ठेवायला हवं, आणि एक करशील रे, जे काय लिहीशील ते मला सेंडशील रे , चल बाय “

मग गेलो दुस-या ताईच्या वॉलवर. वाचलं.  तुझ्या सोबत चालयचय,हातात हात गुंफून,  वाट चालायचीय तुला सोबतीला घेऊन ……. तू ,रागवलास की हळूच तुला वेडावून दाखवायचय,.... प्राजक्त,बकुळ,मोगरा,रातराणी ओंजळीत तुला द्यायचीय.  असलं लिहीलेलं , ताईनी.  मग मित्रांच्या वॉलवर चकरा मारल्या, गरीब बिचारे , आपापल्या नवरासूरमर्दीनीचे अश्राप नवरे, काही , माझ्यासारखे , काय असून असून असणारेत स्वप्नं ? विचार केला आणि चक्क मलाही सुचलं , छान तरल काव्यात्मक गद्य.मला तरी वाटतंय आम्हां जेन्टस, पुरूषांची साधी , छोटी स्वप्नं , तरलपणेे प्रतिबिंबीत झालीयेत. तुम्हीही वाचून कळवा हं अभिप्राव. पहिलाच प्रयत्न आहे नं .

तुझ्यासोबत चालाचचय,
तुझ्याच मागून मागून वाट चालायचीय बाजाराची, हाती पिशवी घेऊन. ( वझ्झं पेलत) 
उन्हाळे,पावसाळे,बोचरी थंडी सारं तुझ्या बरोबर अनुभवायचय,
लादी मी पुसताना, मॉप आणताना तुला बघायचय.
तुझ्या कडून हक्काने चहाचा कप मागायचाय  कपबश्या विसळशील नं सोन्या? करशील ना रे तेवढं ? असल्या तुझ्या लटक्या प्रश्नांना लटकी उत्तर द्यायचियेत.  कित्ती कित्ती गोष्टी आहेत गं तुझ्या सोबत करण्याच्या,  तु भांडलीस की कँफे कॉफी डे ला न्यायचय
तुझ्यावर मला पण कधी खरं,कधी खोटं रागवायचय.  वाणी, इस्त्री, येमेशीबी बिल तुझ्या हाती द्यायचय वैतागलीस किती तरी, मलाच भरून यायचय.
  तुला नाहीच कळणार बऱ्याच माझ्या गोष्टी,तरीही मला तुझ्याच मागुन चालायचय बाजारात,  पिशवी  हातात धरून.(वझ्झं पेलत)
( “तुझं काही होण्यातलं नाही रे, चारोळी लिहीतोस त्याच छान असतात “अशी ताईची प्रतिक्रीया का आली कोण जाणे ?)

No comments:

Post a Comment