Wednesday, 12 April 2017

दुपारी दोन अष्टाक्षरी वाचायला मिळाल्या. अष्टाक्षरीबाबत माहिती नाही पण , या दुपारपासून एका ओळीत अक्षरे आठचा फॉर्म्याट डोक्यात होता . संध्याकाळी जे सुचलय त्याला अष्टाक्षरी म्हणावे का? ते तुम्हीच ठरवा. 
सरेना ढळेना काळ
थांबला अता तो काळ
संपेना परि हा खेळ
वार्धक्याची सरे वेळ 

कमावुनी उरे काही
घालविणे अता नाही
शेवटचे बोलू काही
पुन्हा जन्म घेणे नाही 

उतलो मातलो जरी
खंत नाही मम उरी
आनंदाची झाली वारी
जाण्यासाठी पैलतिरी 

सगे सोयरे सोडणे
पाश मायेचे तोडणे
नेत्र अल्लद मिटणे
इथेच सारे त्यागणे 

आता जीवन थांबेल
मरणाची घालमेल
सुकून मग जाईल
अष्टाक्षरीची ही ओल

No comments:

Post a Comment