हाऊ टू फेल इन लाईफ हातात पडलं तेव्हा उत्सुकता होतीच. दुस-याच्या चुका आपण पटकन बघतो की नाही.इथे तर केलेल्या चुकांवरच पुस्तक. म्हंटलं बघूया तरी. कथा कादंब-या वाचायची सवय एकेक अपयश, चुक रंगवून पाच पन्नास पानं लिहीतात ते वाचायची सवय. साधारण अंदाज असा की एक दोन, अपयशं , चुका असतील. तेवढ्यावर फोकस करायचा, मस्तपैकी कितीक वर्ष निद्रिस्त असलेल्या जोशी ला या मुळे जाग आली. कुत्सीतपणाच्या पेन्सीलला टोक करून ठेवलं, जादा काळजी म्हणून विखारीपणाच्या पॉलीश पेपरनं टोक घासूनही ठेवलं. सध्या गाजत असलेल्या एका लेखकाच्या चुकांवर लिहायचं होतं नं ? पण पुस्तक वाचत गेलो. एकेक प्रकरण , केलेल्या चुका, त्यातून दिलेला संदेश. कशाकरता, यातल्या एखाद्या अनुभवतातून व्यक्ती जात असेल तर त्याला मार्ग मिळावा, चुक टाळली जावी, अपयश टाळले जावे. मुळात इलेक्ट्रीकल इंजिनियर असलेल्या एका व्यावसायीकाचे अनुभव आहेत हे. बर्वेनी अत्यंत संयमीत भाषेत अनुभव लिहीले आहेत. चुका , अपयश पटकन कुणी सांगत नाही. पण बर्वेनी सांगितल्या आणि सोबत काही महत्वाच्या गोष्टी. व्यावसायिकाला हे पुस्तक वाचलं तर लक्षात येईल यातली एक ना एक चुक कधी ना कधी घडलेली असेलच. बर्वेंबद्दलची इमेज बदलली माझी. ह्या चुका बर्वेनी एकट्याने केल्या आहेत हेच पटत नाही. पण भावनीक गुंता न करता, बाकी कुणालाही दोष न देता ह्या चुकाकरता स्वतःलाच जबाबदार धरून त्याविषयी लिहीलं आहे. पुस्तक वाचत गेलो तसं कळलं की नोकरी करणा-या , किंवा सामान्य माणसालाही काहीतरी संदेश देण्याचा प्रयत्न ह्या पुस्तकात आहे. म्हणूनच पेन्सील बाजूला ठेवली. दिशाहीन असु नये.आपल्याला कळत नसेल तर मोठ्यांना विचारावं. भिडस्त असू नये. क्याश क्रेडीट लिमीट म्हणजे खेळतं भांडवल, गाड्यांचे डाऊनपेमेंट वा मशिनरी घ्यायला वापरू नये. संधी वारंवार येत नसते , ही संधी आपल्यासाठी आहे हे ओळखता यायला हवं. शब्द आणि वेळेची किंमत हवी. व्यावसायिकांना सांगीतलेल्या गोष्टीही महत्वाच्या आहेतच. माझ्या व्यावसायिक मित्रांनी केलेल्या चुका माहिती आहेत.त्यामुळे पटतात विचार. पण वर सांगीतलंय ते व्यावसायिकाबरोबरच सामान्य माणसांसाठीही उपयुक्त आहे. या पुस्तकाच्या शेवटी वहिनीनी लिहीलं आहे तेही महत्वाचं. थोडक्यात लिहीलय पण दोन संदेश दिलेत. एखादी व्यक्ती जेव्हा चुकते , तेव्हा त्या अपयश किंवा चुका त्याच्या एकट्याच्या नसतात, त्यात इतरांचाही वाटा असतो. तुमच्या आयुष्यात एक मार्गदर्शक हवा. त्याच्याशी बोलताना कुठलाही इगो न ठेवता बोलुन टाकला पाहिजे.परिस्थिती हाताबाहेर जात असेल तर न्यूनगंड न बाळगता मोकळेपणानी बोला. त्यातुन मार्ग निघत जातात. पुस्तक संपवतानाची बर्वेंची वाक्यही कायम लक्षात ठेवण्यासारखीच आहेत पण ती मी सांगणार नाही. ती पुस्तकात वाचा. स्वतःची पुस्तकं प्रकाशीत करत असताना, प्रकाशन संस्था सुरू केलेली असताना , आपण केलेल्या चुकांवर पुस्तक आपणच काढणे हे धाडसाचं काम. हे पुस्तक मला १० वर्षापुर्वी मिळालं असतं , तर मी स्वतःही काही वेगळा दिसलो असतो असं म्हणण्यात पॉईंट नाही. इथुन पुढे यातून जे शिकलो ते अंमलात आणायचं हे विचार मनांत आले, म्हणूनच पुस्तक संग्राह्य खात्यात जमा करतोय. थँक्स हर्षद शामकांत बर्वे 💐 ,Rucha वहिनी , बै आणि मी ची प्रस्तावना, हाऊ टू फेल मधलं लिखाण वाचून एवढंच म्हणेन अधुनमधुन लिहीत जा ,पोस्ट पण करा. शैली मस्त आहे
No comments:
Post a Comment