कालचीच गोष्ट मित्राच्या गाडीवर मागे बसून चाललो होतो, पटेल चौकाकडून आमराईकडे निघालेलो. तो विचारत होता, आरटीओ ला लायसन्स काढून घ्यायला काय करावं लागतं ?, किती खर्च येतो वगैरे. लेकानी नवीन गाडी घेऊन पिटाळायला सुरूवात केलेली. लायसन्सचा पत्ता नाही. नेमकं आमराईसमोर पांढरे बगळे उभे , एक नाही दोन नाही पाच. येणा-या जाणा-यांची चेकींग सुरू. मनात विचार आला लागलं आता चंदन. हा पठ्ठयानी सरळ एका बगळ्यापाशी जाऊन गाडीचा स्पीड कमी केला. जरा आजूबाजूला बघत पटकन विचारलं
"ओ , मामा, आयसीआयसीआय बँक कुठे आली हो ?"
त्या बगळ्यानी बघितलं आणि हवेत हात हलवून सांगीतलं ,
"मागं -हायली की, राजवाडा चौकात जा "
मानबीन हलवत , थँक्यू म्हणत युटर्न मारला , आणि थोडं अंतर जाऊन पलीकडच्या गल्लीतून योग्य मार्गाला लागलो हसत. कमालेय, त्याच्या जागी मी असतो तर नसतं सुचलं इतक्या पटकन सुप्रभात मंडळी
No comments:
Post a Comment